Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
किडनीत रक्ताची गाठ झाल्यास दिसतात 'ही' लक्षण

किडनीत रक्ताची गाठ झाल्यास दिसतात 'ही' लक्षण

रीरात रक्ताच्या गाठी तयार होतात याबाबत तुम्ही कधीना कधी वाचलं असेलच. वेगवेगळ्या कारणांनी शरीरातील वेगवेगळ्या भागांमध्ये या रक्ताच्या गाठी तयार होत असतात. ज्या गंभीर समस्या निर्माण करू शकतात.

रीनल व्हेन थ्रोम्बोसिस एकप्रकारची रक्ताची गाठ असते. ही किडनीच्या अशा नसांमध्ये तयार होते ज्या विषारी तत्व बाहेर काढण्याचं काम करतात. किडनीमध्ये जर रक्ताची गाठ तयार झाली तर शरीरातील विषारी तत्व पूर्णपणे बाहेर निघू शकत नाहीत. ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर आणि किडनी फेल होण्याचा धोका वाढू शकतो. त्याशिवाय अनेक केसेसमध्ये ही स्थिती जीवघेणीही ठरते.

महत्वाची बाब म्हणजे किडनी स्टोन झाल्यावर जी लक्षणं दिसतात ती ब्लड क्लॉटिंगच्या स्थितीमध्येही दिसतात. अशात स्वत:च एखाद्या निष्कर्षावर पोहोचण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि टेस्ट केली तर अधिक बरं होईल.

आमच्या न्यूजलेटरसाठी साईन-अप करा

रीनल व्हेन थ्रोम्बोसिसची लक्षणं

किडनीमध्ये ब्लड क्लॉटिंग म्हणजे रक्ताची गाठ तयार होणं फारच घातक असतं. त्यामुळे याच्या सुरूवातीच्या लक्षणांकडे लक्ष देणं फार गरजेचं असतं. जी खाली सांगण्यात आली आहेत.

पोटाच्या एका बाजूला, पाय किंवा मांड्यांमध्ये वेदना

लघवीतून रक्त येणे

ताप

उलटी किंवा मळमळ

पायांवर सूज

श्वास घेण्यास अडचण

ही लक्षणं इतरही वेगवेगळ्या आजारांमध्ये दिसणारी असतात. त्यामुळे यांना सामान्य समजून दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. कारण तसं कराल तर गंभीर समस्येचा सामना करावा लागू शकतो.

किडनीत रक्ताची गाठ का होते

शरीरात रक्ताच्या गाठी अनेकदा अचानकच तयार होता. याचं काही स्पष्ट असं कारण नसतं. पण काही अशा गोष्टी आहेत ज्याने याची शक्यता वाढते. यात डिहायड्रेशन, गर्भ निरोधक किंवा एस्ट्रोजन थेरपी, ट्यूमर, पाठ किंवा पोटावर जखम, किडनीच्या आजाराची फॅमिली हिस्ट्री, नेफ्रोटिक सिंड्रोम आणि ब्लड क्लोटिंग डिसऑर्डर यांचा समावेश आहे.

कशी मिळते याची माहिती

कंप्यूटेड टोमोग्राफी (CT) एंजियोग्राफी रीनल व्हेन थ्रोम्बोसिसच्या निदानासाठी सगळ्यातआधी टेस्ट करा. त्याशिवाय यूरिन टेस्ट- यूरीनालिसिस, अल्ट्रासाउंड, एमआरआयच्या माध्यमातूनही याची माहिती घेऊ शकता.

कसा टाळावा धोका

या स्थितीपासून बचाव करण्यासाठी कोणताही ठोस असा उपाय नाहीये. पण याची शक्यता कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर समस्या झाल्यावर ब्लड थिनर औषधांचं डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करा.

(सोशल मीडियावरून साभार)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka