Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वी ₹1500; ₹3000 च्या चर्चेला पूर्णविराम

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वी ₹1500; ₹3000 च्या चर्चेला पूर्णविराम

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जुलै महिन्याच्या सन्मान निधीच्या वितरणाची तांत्रिक प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली असून, पात्र महिलांच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यात ₹1500 जमा होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून ₹3000 एकाचवेळी खात्यात जमा होणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र, सध्या सरकारकडून केवळ जुलै महिन्याचा ₹1500 हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप जमा करण्यात आलेला नाही.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात ₹1500 जमा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, लाभार्थी महिलांनी आपल्या बँक खात्याला आधार लिंक आहे का, खात्यात रक्कम जमा झाली आहे का आणि बँकेकडून SMS आला आहे का, याची तपासणी करावी. बँक अॅप, एटीएम किंवा बँक शाखेच्या माध्यमातूनही खात्यातील शिल्लक तपासता येणार आहे.त्यामुळे ₹3000 मिळणार असल्याच्या चर्चेऐवजी सध्या जुलै महिन्याच्या ₹1500 हप्त्यावरच लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka