Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत उपोषण; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच

MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत उपोषण; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षा CBT (Computer Based Test) पद्धतीने घेण्याच्या आणि Normalization प्रणाली लागू करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सीबीडी बेलापूर येथील MPSC मुख्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

आंदोलनाला विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटना तसेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

काँग्रेसने या निर्णयामुळे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होणार असल्याचा आरोप केला आहे. अधिवेशनात महाविकास आघाडीच्या आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केल्याचेही पक्षाने सांगितले. तसेच MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्याशी विद्यार्थी संघटनांसोबत संयुक्त बैठक घेण्याची दोनदा विनंती करण्यात आली होती, मात्र त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा करण्यात आला.

प्रदेश काँग्रेसने २८ जून रोजीच सरकार आणि MPSC प्रशासनाला इशारा दिला होता की, CBT व Normalization बाबतचा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन छेडले जाईल. त्यानुसार आजपासून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.

आंदोलनात काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा दळवी, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष धनंजय रामकृष्ण शिंदे, ओबीसी विभागाचे सरचिटणीस दिगंबर राऊत, राज्य सरचिटणीस आनंद सिंह, महिला काँग्रेसच्या उज्वला साळवे, तसेच श्रुती म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

CBT आणि Normalization संदर्भातील निर्णय तात्काळ मागे घेऊन विद्यार्थ्यांशी खुली चर्चा करावी आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असून मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत उपोषण व ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka