Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पाणी पिताना केलेल्या ३ चुका पडतात महागात

पाणी पिताना केलेल्या ३ चुका पडतात महागात

पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे, केस आणि शरीर या सर्व महत्त्वाच्या कार्यांसाठी पाणी आवश्यक आहे. शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून तज्ज्ञ पाणी पिण्य़ाचा सल्ला देतात.

पण पाणी पिण्याची देखील ठराविक वेळ असते. पाणी पिताना आपल्याकडून बरेच नकळत चुका घडतात. ज्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. आपल्या शरीरात सुमारे ६५ टक्के पाणी असते. हे प्रमाण वय, लिंग, उंची, वजन आणि शारीरिक हालचालीं नुसार बदलते. त्यामुळे पाणी पिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? कोणत्या गोष्टी टाळाव्या? पाहा.

अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा

बहुतांश लोक अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पितात. परंतु याचा पचनक्रियेवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे पोटाचे विकारही वाढतात. अन्न व्यवस्थित पचत नाही. अशावेळी पचन नीट न झाल्याने शरीराला पोषक तत्वे पूर्णपणे मिळत नाही.

उभं राहून पाणी पिणे

वडीलधाऱ्यांनी आपल्याला उभं राहून पाणी पिणे म्हणजे आरोग्यासाठी घातक असा सल्ला नक्कीच दिला असेल. यामुळे पचन क्रियेवर वाईट परिणाम होतोच पण नसांवरही ताण पडतो. ज्यामुळे सांधेदुखी होऊ शकते. यासोबतच किडनी आणि फुफ्फुसावरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे नेहमी बसून पाणी प्यावे.

एकाच वेळी भरपूर पाणी पिणे

उत्तम आरोग्यासाठी पाणी पिणे आवश्यक. परंतु, एकाच वेळी भरपूर पाणी प्यायल्याने नुकसान देखील होऊ शकते. एकाच वेळी पाणी प्यायल्याने इलेक्ट्रोलाइट असंतुलित होते. ज्यामुळे डोकेदुखी, थकवा आणि मळमळ होऊ शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka