Dailyhunt
पाणी प्याल तर कायम फिट रहाल

पाणी प्याल तर कायम फिट रहाल

पाणी शरीरासाठी फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेट होते. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी पाणी मदत करते. ज्यामुळे पोट साफ होते. पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत.

पण पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? पाणी कधी प्यावे, कधी पिऊ नये? काही जण जेवण करताना मध्येच पाणी पितात, तर काही जण दिवसभरात ३ ते ४ ग्लासावर अधिक पाणी पीत नाही. पाणी पिण्याचे जितके फायदे आहेत, तितकेच अयोग्य वेळी पिण्याचे तोटे देखील आहेत.

सकाळी उठताच पाणी प्या

.शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी सकाळी पाणी पिणे गरजेचं आहे. रात्री जेवल्यानंतर आपण सकाळी नाश्ता करतो. त्यामुळे सकाळची सुरुवात नेहमी एक ग्लास पाण्याने करा. आपण रात्रभर काहीच खात नाही, ज्यामुळे आपला उपवास होतो. त्यामुळे सकाळी पाणी किंवा कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या.

जेवण करण्यापूर्वी पाणी प्या

जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट साफ होण्यास मदत होते. ज्यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचते, शिवाय वजन कमी करण्यास मदत होते. जेवणाच्या ३० मिनिटापूर्वी आणि दिवसभरात ५०० मिलीलीटर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. नियमित १२ आठवडे हा नियम फॉलो केल्याने वजन कमी होण्याचा वेग वाढतो.

झोपण्यापूर्वी पाणी पिणे आवश्यक

झोपण्यापूर्वी पाणी प्याल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारते. जर हृदयाच्या निगडीत समस्या असतील, किंवा ब्लड प्रेशरचा त्रास असेल, तर शरीर हायड्रेट ठेवा. पाणी पीत राहा. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. यासह पोटाचे विकार दूर होतात.

आंघोळीपूर्वी पाणी प्या

एक ग्लास कोमट पाणी ब्लड प्रेशर लेव्हल कमी करण्यास मदत करते. आंघोळ करण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यावे, यामुळे रक्ताभिसरण प्रणालीचा विस्तार होईल, ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन मध्ये अडचण येत नाही.

एक्सरसाईज करण्यापूर्वी पाणी पिणे

एक्सरसाईज केल्या नंतर आणि करण्यापूर्वी पाणी पिणे गरजेचं आहे. पाणी शरीराला उर्जा प्रदान करते. ज्यामुळे व्यायाम करताना कोणतीही अडचण निर्माण होत नाही. एक्सरसाईज करण्यापूर्वी नि केल्यानंतर आणि करतानाही पाणी पिऊ शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka