Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राज्यमाता गोमाता संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांनी सहभागी व्हावे; प्रतीक बनकर

राज्यमाता गोमाता संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांनी सहभागी व्हावे; प्रतीक बनकर

शिरूर (अरुणकुमार मोटे): पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'राज्यमाता गोमाता संवाद यात्रा' या राज्यव्यापी उपक्रमाला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा राबविण्यात येत असून, गोसंवर्धन आणि गोसेवेबाबत जनजागृती करणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

पुणे जिल्हा समन्वयक प्रतीक बनकर हे जिल्ह्यातील विविध शहर, गाव आणि ग्रामीण भागात दौरे करून नागरिकांशी संवाद साधत आहेत. गोप्रेमी, शेतकरी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना तसेच युवकांनी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या यात्रेच्या माध्यमातून गोवंशाचे संरक्षण व संवर्धन, गोशाळांचे सक्षमीकरण, शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकरी व गोप्रेमींपर्यंत पोहोचविणे, तसेच दुग्ध व्यवसाय आणि सेंद्रिय शेतीला चालना देणे यावर भर दिला जात आहे. राज्यातील गोशाळा, पशुपालक आणि शेतकरी यांच्यासमोरील अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठीही संवाद साधला जाणार आहे.

या राज्यव्यापी मोहिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

यावेळी बोलताना प्रतीक बनकर म्हणाले, "राज्यमाता गोमाता संवाद यात्रा ही केवळ जनजागृती मोहीम नसून गोसेवा, गोसंवर्धन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी लोकचळवळ ठरत आहे. गोवंश संवर्धन, शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि सेंद्रिय शेतीचा प्रसार यासाठी ही यात्रा महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे."

पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिक, गोप्रेमी, शेतकरी, युवक आणि सामाजिक संस्थांनी या संवाद यात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून गोसंवर्धनाच्या कार्याला हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka