Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिक्रापूरात मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडले; रिपेअरिंगसाठी आलेले मोबाईल, पॉवर बँकांसह १७,६०० रुपयांचा ऐवज लंपास

शिक्रापूरात मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडले; रिपेअरिंगसाठी आलेले मोबाईल, पॉवर बँकांसह १७,६०० रुपयांचा ऐवज लंपास

राज हॉटेलशेजारील 'शिवराज मोबाईल रिपेअरिंग' दुकानाचे पत्रे उचकटून चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : शिक्रापूर येथील राज हॉटेलशेजारी असलेल्या शिवराज मोबाईल रिपेअरिंग दुकानाचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्याने रिपेअरिंगसाठी आलेले मोबाईल फोन व पॉवर बँक असा एकूण १७ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दुकानमालक संतोष विश्वनाथ सानप (वय ३५, रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सानप यांचे पुणे-नगर महामार्गालगत राज हॉटेलजवळ शिवराज मोबाईल रिपेअरिंग नावाचे दुकान आहे. २३ जुलै रोजी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडल्यानंतर रिपेअरिंगसाठी आलेले चार मोबाईल फोन आणि चार पॉवर बँक जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

तपासणी केली असता दुकानाचा समोरील पत्रा उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून चोरी केल्याचे स्पष्ट झाले. चोरीस गेलेल्या ऐवजात वनप्लस नॉर्ड सी-२, विवो टी-३, टेक्नो आणि सॅमसंग गॅलेक्सी कंपनीचे मोबाईल तसेच चार पॉवर बँकांचा समावेश असून, एकूण १७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कर्पे करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka