Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; e-KYC साठी २० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ

शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; e-KYC साठी २० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ

पुणे : राज्यभरातील खाजगी शाळांमधील अनुदानित, अंशतः अनुदानित तसेच जिल्हा परिषदांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

शालार्थ प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांचे e-KYC पूर्ण करण्यासाठी २० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे.

यापूर्वी ऑगस्ट २०२६ पर्यंत e-KYC पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, विभागीय आणि क्षेत्रीय स्तरावरील आढाव्यात अद्याप काही कर्मचाऱ्यांची प्रक्रिया पूर्ण होणे बाकी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी शिक्षण विभागाने अंतिम मुदतवाढ दिली आहे.

२० सप्टेंबरनंतर मुदतवाढ नाही

शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी तसेच शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. २० सप्टेंबर २०२६ पर्यंत e-KYC पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर २०२६ चे वेतन, जे नोव्हेंबरमध्ये अदा केले जाते, देण्यात येणार नाही. तसेच यापुढे e-KYC साठी कोणतीही अतिरिक्त मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शाळांना तातडीने सूचना देण्याचे निर्देश

या निर्णयाची गंभीर दखल घेत सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, मुंबईचे शिक्षण निरीक्षक तसेच वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकांना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना तात्काळ सूचना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

MahaIT ला तांत्रिक सुविधांच्या सूचना

शालार्थ प्रणालीची तांत्रिक जबाबदारी असलेल्या MahaIT ला देखील आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. e-KYC पूर्ण करण्यासाठी प्रणालीमध्ये आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे २० सप्टेंबरपर्यंत e-KYC पूर्ण होणार नाही, अशा कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन बिल प्रणालीमध्ये तयार होणार नाही, अशी Validation व्यवस्था करण्याच्या सूचनाही MahaIT ला देण्यात आल्या आहेत.त्यामुळे संबंधित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी शालार्थ प्रणालीतील e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka