Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर.

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर.

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना समोर आली. नदीच्या प्रवाहात तरंगत असलेला एका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात पुरुषाचा मृतदेह अचानक समोर आला.

धक्कादायक बाब म्हणजे, या पुरुषाचे हात-पाय दोरीने घट्ट बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

नदी पात्रात फुगलेल्या आणि छिन्नविछिन्न अवस्थेत आढळलेला हा मृतदेह साधारणतः महिनाभरापूर्वीचा असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाची झालेली दुरवस्था पाहता, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानेच हातपाय बांधून मृतदेह नदीच्या पात्रात फेकून दिला का? असा संशय व्यक्त केला जात आहे.

संबंदित प्रकार केवळ अपघात नसून एक थंड डोक्याने केलेला खून असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतदेह अनेक दिवस पाण्यात राहिल्यामुळे तो सडलेला आहे. त्यामुळे मृताची ओळख पटवणे पोलिसांसाठी सर्वात मोठे आव्हान आहे. हा अपघाती मृत्यू आहे, की पूर्ववैमनस्यातून किंवा भांडणातून झालेला खून? याचे गूढ उकलण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

शिक्रापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले की, 'पोलिसांचं विशेष पथक मृताची ओळख पटवण्यासाठी आणि या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सर्व बाजूंनी कसून तपास करत आहे.'

शिरूर तहसिल कार्यालयाच्या गौण खनिज विभागाची 'खुर्ची' संध्याकाळी सहा नंतर खाजगी एजंटांच्या ताब्यात…?

शिरूर हादरलं! लॉजमध्ये युवतीवर 7 जणांचा आळीपाळीने अत्याचार; पाहा नावे…

Video: शिरूरमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच महिलेचा जीव गेल्याचा गंभीर आरोप…

शिरूर तालुक्यात गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या योगेश मचाले टोळीवर 'मोक्का'…

शिरूर तालुक्यात हॉटेलसमोर तरुणाला काठ्यांनी मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल…

Loading…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka