Dailyhunt
शिरुरमध्ये धक्कादायक प्रकार 'मित्रा'कडुन कारचा अपहार

शिरुरमध्ये धक्कादायक प्रकार 'मित्रा'कडुन कारचा अपहार

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका व्यक्तीने पुण्याला काम आहे असे सांगत मित्राची चारचाकी कार घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असुन मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी फिरोज हसन शेख (वय ३०, रा.

गुनाट ता. शिरुर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी भगवान बाळू डोर्लेकर (मूळ रा. टिटवाळा रोड, अनाखर, ठाणे; सध्या रा. न्हावरे ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरोधात शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १२:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी भगवान डोर्लेकर याने फिर्यादी फिरोज शेख याच्याकडे "पुण्यात कामासाठी ३-४ दिवस जायचे आहे" असे सांगत त्याच्याकडे त्याची चारचाकी कार मागितली. त्यानंतर विश्वासाने फिरोज शेख यांनी आपली मारुती सुझुकी कंपनीची इरटीका (MH 14 FM 3581) ही कार आरोपीकडे दिली.

मात्र, ठरलेल्या वेळेत कार परत न करता आरोपीने ती स्वतःकडेच ठेवून अपहार केला आणि फरार झाला. काही दिवस वाट पाहूनही कार परत न मिळाल्याने अखेर फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी दि. २८ एप्रिल २०२६ रोजी शिरुर पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस हवालदार विनोद मोरे हे करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka