Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वाघाळे गावच्या उपसरपंचपदी राजेंद्र धायबर यांची बिनविरोध निवड

वाघाळे गावच्या उपसरपंचपदी राजेंद्र धायबर यांची बिनविरोध निवड

वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचयातीच्या उपसरपंचपदी राजेंद्र रामदास धायबर यांची मंगळवारी (ता. २५) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. वाघाळे ग्रामस्थांसह परिसरातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सरपंच अनिता गावडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. निवडणुकीचे कामकाज ग्रामसेविका शितल भालशिंग यांनी पाहिले. तत्कालीन उपसरपंच दादा सोनवणे यांनी सर्वांना संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला व राजेंद्र धायबर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश कार्याध्यक्ष निर्मला नवले, शिरूर तालुका खरेदी-विक्री संघ संघालक लहू थोरात, सरपंच अनिता गावडे, राजाराम भोसले, नंदा शेळके, अनिता शेळके, विकास कारकुड, नरसिह घोलप, अशोक सोनवणे, सुहास काटे, संदीप धायबर, संदीप शेळके, किसन गोरडे, अमोल धरणे, वैभव गावडे, रामदास शेळके, विजय घोलप, राजू थोरात, राजेंद्र जगताप, आनंदराव सोनवणे, एकनाथ डफळ, राजू माकर, ओमकार थोरात, पांडुरंग घोलप, हिम्मत थोरात, प्रवीण शेळके, अजिंक्य थोरात, फक्कड थोरात आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. सुहास काटे यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप धायबर यांनी उपस्थितांचे आभार मानले. दरम्यान, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच राजेंद्र धायबर यांचा सत्कार करण्यात आला.

'सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या नेतृत्वाखाली गावचा सर्वांगीण विकास करणार आहे.'
- नवनिर्वाचित उपसरपंच राजेंद्र धायबर.

Loading…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka