Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वाघाळे येथून वाघेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान.

वाघाळे येथून वाघेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान.

वाघाळे : श्रीक्षेत्र वाघाळे (ता. शिरूर) येथून सालाबादप्रमाणे वाघेश्वर पायी दिंडी सोहळा कार्तिकी वारीसाठी आज (गुरुवार) भक्तिमय वातावरणात आळंदीकडे प्रस्थान झाला. गावातील सर्व स्तरातील भाविकांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर "विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल" या घोषणांनी दुमदुमून गेला होता.

आज सकाळी ठीक नऊ वाजता ग्रामदैवत श्री वाघेश्वर महाराज यांच्या मंदिरात पूजा-अर्चा आणि गाथा-भजनाचा कार्यक्रम पार पडला. भक्तीभावाने सजलेल्या पालखीसोबत टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडीने गावातून मार्गक्रमण केले.

दिंडीला निरोप देण्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये बबन भोसले, दत्तात्रय गायकवाड, एकनाथ डफळ, विजय शेळके, तुकाराम भोसले, हिम्मत थोरात, भरत थोरात, अंकुश शेळके, बाळासाहेब थोरात, शामराव शेळके, देवराम थोरात, दौलत थोरात, अशोक थोरात, किसन गोरडे, अंकुश धायबर, बबन यशवंत, बाजीराव भोसले, नरशिंग घोलप, संपत थोरात, भीमराव थोरात आणि रावसाहेब थोरात आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने महिला भगिनींची उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी चौकात दिंडी थांबल्यावर मा. जि. प. सदस्य शेखर पाचुंदकर आणि दत्तात्रेय पाचुंदकर यांनी पालखीचे दर्शन घेऊन दिंडीकरांना शुभेच्छा दिल्या. या पायी दिंडी सोहळ्यामुळे वाघाळे परिसरात भक्तीचा आणि उत्साहाचा माहोल अनुभवायला मिळाला. "विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल" या घोषात दिंडी आळंदीकडे मार्गस्थ झाली.

Video: कारेगाव गणातून पंचायत समिती लढवणार : पप्पू भोसले

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka