Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आदर्की खुर्द येथील रानडुक्कर शिकार प्रकरणी चार आरोपींना वनकोठडी

आदर्की खुर्द येथील रानडुक्कर शिकार प्रकरणी चार आरोपींना वनकोठडी

दैनिक स्थैर्य | दि. १ ऑगस्ट २०२६ | फलटण | वनपरिक्षेत्र फलटणमधील आदकी खुर्द येथे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ३० जुलै रोजी रात्री ९.०० च्यादरम्यान रानडुक्कर या वन्यप्राण्याची शिकार करताना चार आरोपींना ताब्यात घेतले.

त्यांचेवर वनगुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात सोमनाथ बाळू भंडलकर (वय ५०, रा. आदर्की खु.), अतुल रमेश जाधव (वय २०, रा. आदकी खु.), विक्रम संतोष डोंबाळे (वय-२४ रा. आदकी खु.), गणेश लक्ष्मण जाधव (वय २५, रा. आदर्की खु., सर्व ता. फलटण, जि. सातारा) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

फलटण येथील प्रथम न्यायदंडाधिकारी यांनी आरोपींना एक दिवसाची वनकोठडी सुनाविली आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कोणत्याही वन्यप्राण्यांची शिकार करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. सदर गुन्हयास ३ वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किंवा लाखापर्यंतचा दंड किंवा दोन्हीही शिक्षेची तरतूद कायद्यामध्ये आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी यांचेकडून मोबाईल-३ व मोटारसायकल क्र. चक११इण४५८५ इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई अमोल सातपुते (उपवनसंरक्षक, वनविभाग सातारा) यांच्या मार्गदर्शनाखाली दिगंबर जाधव (सहाय्यक वनसंरक्षक, रोहयो व वन्यजीव, सातारा), निकिता बोटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी फलटण, महादेव पाटील वनपाल आदर्की, सूरज इनकर वनरक्षक डवळ (अति. आदी), विशाल शिंदे (वनरक्षक वडले) तसेच वनपरिक्षेत्र फलटण येथील वनकर्मचारी यांनी केली. पुढील तपास निकिता बोटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, फलटण करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya