Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एसटी बसस्थानकांवर १२५ नवे 'हिरकणी कक्ष'; टोयोटा किर्लोस्करचा सामाजिक पुढाकार

एसटी बसस्थानकांवर १२५ नवे 'हिरकणी कक्ष'; टोयोटा किर्लोस्करचा सामाजिक पुढाकार

राज्यभरातील एसटी बसस्थानकांवर माता आणि लहान मुलांच्या सुविधेसाठी १२५ अद्ययावत हिरकणी कक्ष उभारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १५ सप्टेंबर : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध बसस्थानकांवर प्रवास करणाऱ्या माता आणि त्यांच्या लहान बालकांच्या सुविधेसाठी १२५ नवे 'हिरकणी कक्ष' उभारण्यात येणार आहेत.

टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून हे कक्ष उभारले जाणार असून, यामुळे प्रवास करणाऱ्या हजारो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एसटी बसने दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. यामध्ये प्रवास करणाऱ्या स्तनदा मातांची आणि लहान मुलांची बसस्थानकांवर होणारी गैरसोय टाळण्यासाठी हे हिरकणी कक्ष अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. या कक्षांमध्ये महिलांना सुरक्षित आणि खाजगी वातावरणात बालकांना स्तनपान करवता येईल, तसेच लहान मुलांची काळजी घेणे सोपे होणार आहे.

टोयोटा किर्लोस्कर कंपनीच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या या हिरकणी कक्षांमध्ये पिण्याचे पाणी, बसण्यासाठी आरामदायी व्यवस्था, स्वच्छता आणि आवश्यक प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्रमुख आणि गर्दीच्या ठिकाणच्या बसस्थानकांची निवड करण्यात आली असून लवकरच या कक्षांचे काम पूर्ण करून ते प्रवाशांच्या सेवेत दाखल केले जातील.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya