दैनिक स्थैर्य | दि. २६ जुलै २०२६ | फलटण | गुणवरे (ता. फलटण) येथील प्रियंका तानाजी कर्णे (वय २८ वर्षे) या महिलेचा जनावरांच्या गोठ्यात दूध काढताना शॉक लागून मृत्यू झाल्याची फिर्याद तिचे पती तानाजी कर्णे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
तानाजी कर्णे व त्यांची पत्नी प्रियंका कर्णे हेे जनावरांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या गाईचे दूध काढण्यासाठी गेले होते. त्यांनी मशीनने दूध काढल्यानंतर दुधाची कॅन गोठ्याच्या छताला असलेल्या लोखंडी पाईपला अडकविताना त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे नेलेे असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्या मृत झाल्याचे सांगितले.

