Thursday, 21 Jan, 1.12 pm स्थैर्य

मनोरंजन
जिया खानच्या बहिणीनंतर आता शर्लिन चोप्राचा साजिद खानवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन केला खुलासा

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

स्थैर्य, दि २१: दिवंगत अभिनेत्री झिया खानची बहीण करिश्मा नंतर आता शर्लिन चोप्राने दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. शार्लिनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना सांगितले की, ती काही वर्षांपूर्वी साजिद खानला भेटली होती. या भेटीत साजिदने तिच्यासमोर अश्लील कृत्य केले होते.

शार्लिन चोप्राने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. शर्लिनने लिहिले की, 'वडिलांच्या निधनाच्या काही दिवसांनी एप्रिल 2005 मध्ये मी त्याला (साजिद) भेटायला गेले तेव्हा त्याने पॅन्टमधून आपले गुप्तांग बाहेर काढले. मला स्पष्ट आठवते की मी त्याला म्हणाले होते की गुप्तांग कसे असते मला माहीत आहे. मी त्याला भेटायला आलेला. इतर गोष्टींसाठी नाही.'

या पोस्टनंतर शार्लिनने सोशल मीडियावर आणखी काही पोस्ट शेअर करून साजिदवर अनेक गंभीर आरोप केले. तिने आपल्या पोस्टमध्ये बॉलिवूड माफियांचाही उल्लेख केला आहे.

चित्रपटात काम देणयाचे आमिष दाखवून करतात अत्याचार
एका पोस्टमध्ये शर्लिनने लिहिले की, "एका महत्वाकांक्षी अभिनेत्रीला एखाद्या चित्रपटात काम करण्याचे निमित्त सांगून चुकीच्या जागी स्पर्श करण्यास भाग पाडणे, हे योग्य आहे का? हे लोक कलाकारांना चित्रपटाचे आमिष दाखवून आपले स्वार्थ का सिद्ध करतात?," असा सवाल शर्लिनने उपस्थित केला आहे.

आणखी एका पोस्टमध्ये शर्लिनने लिहिले की, "तुम्हाला जॉनी सिन्स व्हायचे असेल तर नक्कीच ते व्हा, पण मुलींना बोलवून आणि त्यांना चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी अश्लील कृत्ये करणे ही कुठली सभ्यता आहे?" शर्लिनने आपल्या पोस्टमध्ये साजिदला सोशल मीडियावर टॅग देखील केले आहे.

करिश्माने साजिदवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला
अलीकडेच शर्लिनपूर्वी करिश्मा खानने साजिदवर तिच्यावर आणि जियावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. बीबीसीवर जिया खानच्या आयुष्यावर आधारित 'डेथ इन बॉलिवूड' ही डॉक्युमेंट्री प्रसिद्ध झाली. याच्या दुसर्‍या एपिसोडमध्ये करिश्माने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, ती तालमीची वेळ होती. जिया स्क्रिप्ट वाचत होती आणि त्याचवेळी साजिदने तिला टॉप आणि अंतर्वस्त्र काढण्यास सांगितले. तिला काय करावे हे समजले नाही. घरी आल्यावर ती खूप रडली होती.

हरॅसमेंटनंतरही केले होते चित्रपटात काम
करिश्माने सांगितल्यानुसार, 'जिया म्हणत होती की तिने या सिनेमासाठी करार केला आहे. त्यामुळे जर करार मोडला तर तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि तिची बदनामीही होईल. जर चित्रपट केला तर तिचे शोषण केले जाईल. कोणत्याही परिस्थिती काहीतरी गमवावेच लागणार. असे असले तरी तिने तो चित्रपट पूर्ण केला.'

करिश्माचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला
करिश्माने तिचीही कहाणी शेअर केली. तिने सांगितल्यानुसार, साजिदने तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. करिश्मा म्हणाली, ती मोठी बहीण जियासोबत साजिदच्या घरी गेली होती. त्यावेळी ती 16 वर्षांची होती. तिने फक्त स्ट्रॅपी टॉप घातला होता आणि ती किचन टेबलवर बसली होती. साजिद खान तिच्याकडे टक लावून पाहत होता आणि नंतर म्हणाला तिला सेक्स हवा आहे. यानंतर जियाने साजिदला अडवत म्हटले की, असे काही नाहीये. यावर साजिद जियाला म्हणाला की, बघ ती कशी बसली आहे. याचे उत्तर देताना जिया म्हणाली की ती अजून लहान आहे. तिला काय हवे हे अजून कळत नाही. यानंतर थोड्या वेळात दोघी तिथून निघून गेल्या.

कंगना म्हणाली- मलाही ठार मारण्याचा प्रयत्न केला
डॉक्युमेंट्रीच्या व्हायरल क्लिपवर कंगना रनोट हिने देखील तीव्र प्रतिक्रिया दिली. तिने लिहिले, "त्यांनी जियाला ठार मारले, त्यांनी सुशांतला ठार केले आणि त्यांनी मलाही मारण्याचा प्रयत्न केला. पण माफियांच्या पूर्ण पाठिंब्यामुळे ते मोकळेपणे फिरत आहेत. वर्षानुवर्षे ते बलवान आणि यशस्वी होत आहेत. जग इतके आदर्शवादी नाही, हे समजून घ्यायला हवे. एकतर आपण शिकारी आहात किंवा बळी ठरणारे आहात. कोणीही तुमचे रक्षण करू शकणार नाही. आपल्याला स्वतःचे रक्षण स्वतःच करावे लागेल."

'हाऊसफुल'मध्ये जियाने साजिद खान सोबत केले होते काम
जियाने साजिद खानसोबत अक्षय कुमार, रितेश देशमुख, दीपिका पदुकोण आणि लारा दत्ता स्टारर फिल्म 'हाउसफुल'मध्ये काम केले होते. या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेदरम्यान जिया म्हणाली होती की, "मी आतापर्यंत काम केलेला सर्वात वाईट दिग्दर्शक आहे. त्याने माझे आयुष्य नरक केले आहे."

अनेक महिलांनी केला साजिदवर लैंगिक छळाचा आरोप
2018 मध्ये, भारतात #MeToo मोहीम सुरू झाली तेव्हा बर्‍याच महिलांनी साजिद खानवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. यामध्ये अभिनेत्री सलोनी चोप्रा, राचेल व्हाइट, अहाना कुमरा, मंदाना करीमी, मॉडेल पॉउला आणि एक पत्रकार होती. या आरोपानंतर साजिदला 'हाऊसफुल' फ्रँचायझीचा चौथा चित्रपटाच्या दिग्दर्शनातून काढून टाकण्यात आले होते.

दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya
Top