Thursday, 28 Jan, 8.14 pm स्थैर्य

देश विदेश
जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय बदलला

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.


स्थैर्य, नवी दिल्ली, दि. २८: पदभार स्विकारल्यानंतर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयात बदल केले आहेत. आता H1B वीसा धारकांच्या जोडीदारांना(H4 वीसा होल्डर्स)अमेरिकेत काम करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर बंदी घातली होती. बायडेन यांच्या या निर्णयानंतर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय आयटी प्रोफेशनल्सला दिलासा मिळाला आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, बायडेन यांच्या या निर्णयामुळे अंदाजे एक लाख भारतीयांना याचा फायदा होईल. मागील चार वर्षांपासून त्यांना परत अमेरिकेत काम करता येईल, का नाही ? अशी चिंता होती.

ट्रम्प यांची अँटी इमिग्रेशन पॉलिसी

2015 मध्ये तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी H1B वीसा धारकांच्या जोडीदाराला (पती किंवा पत्नी) अमेरिकेत काम करण्याची मंजुरी दिली होती. यासाठी H4 वीसाची आवश्यकता होती. यापूर्वी त्यांना अमेरिकेत काम करण्याची परवानगी नव्हती. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी यावर बंदी घातली. यामुळे अमेरिकेतील नागरिकांचा रोजगार हिरावला जाईल, असे कारण ट्रम्प यांनी दिले होते.

दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya
Top