Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कोळकी: विद्यार्थ्यांसाठी 'मिशन स्टडी हब' अद्ययावत अभ्यासिका सुरू - जयकुमार शिंदे

कोळकी: विद्यार्थ्यांसाठी 'मिशन स्टडी हब' अद्ययावत अभ्यासिका सुरू - जयकुमार शिंदे

कोळकी (ता. फलटण) येथे गोरगरीब व होतकरू युवक-युवतींसाठी 'मिशन स्टडी हब' नावाने अद्ययावत अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हक्काचे आणि शांततेचे ठिकाण उपलब्ध झाले आहे.

स्थैर्य, कोळकी, दि. २८ मे : ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन अधिकारी व्हावेत, या उदात्त हेतूने कोळकी (ता. फलटण) येथे 'मिशन स्टडी हब' ही सर्व सुविधायुक्त अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला असल्याची माहिती या अभ्यासिकेचे प्रमुख जयकुमार शिंदे यांनी दिली.

कोळकी आणि परिसरातील पंचक्रोशीतील युवक-युवतींना या अभ्यासिकेचा मोठा फायदा होणार आहे. अत्यंत निसर्गरम्य आणि शांत वातावरणामध्ये ही अभ्यासिका उभारण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी येथे फिल्टर केलेले पिण्याचे पाणी, प्रत्येकासाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था, अद्ययावत कॉम्प्युटर यंत्रणा आणि मोफत वाय-फाय (Wi-Fi) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील मुले शिक्षणात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये मागे राहू नयेत, ते शासकीय अधिकारी झाले पाहिजेत, या भावनेने या अभ्यासिकेची निर्मिती करण्यात आली आहे. येथे येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात आवश्यक ते सहकार्य केले जाणार असून, त्यांच्या करिअरवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

ही अभ्यासिका चांगल्या पद्धतीने चालावी आणि विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, यासाठी कोलवडकर अकॅडमी (वडले) चे प्रमुख रवींद्र कोलवडकर सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. दरवर्षी या भागातील अधिकाधिक मुले शासकीय सेवेत रुजू व्हावीत, असा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya