कोळकीतील बुवासाहेब नगरमध्ये ओढ्याचे काम आणि पावसामुळे झालेली वाहतूक कोंडी उदयसिंह निंबाळकर व कार्यकर्त्यांनी सुरळीत केली. प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
स्थैर्य, कोळकी, दि. ०५ जुलै : फलटणचे उपनगर असलेल्या कोळकी येथील बुवासाहेब नगरमध्ये ओढ्यावर सुरू असलेले काम आणि सततच्या पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
उदयसिंह निंबाळकर व इतर कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तातडीने पुढाकार घेत ही वाहतूक कोंडी सुरळीत केली.
कोळकी गावातील बुवासाहेब नगर परिसरात सध्या ओढ्याचे काम सुरू आहे. त्यातच संततधार पावसामुळे रस्त्यावर अडथळे निर्माण झाल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांची आणि वाहनधारकांची मोठी गैरसोय होत होती.
वाहतूक कोंडीची परिस्थिती पाहता उदयसिंह निंबाळकर, रणजित काशीद, चैतन्य दळवी, तेजस बाबर आणि अमरदीप भुजबळ यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यांना ग्रामपंचायतीचे कर्मचारी गेजगे आणि बोडके यांनीही साथ दिली. सर्वांनी मिळून रस्त्यावरील अडथळे दूर करत वाहतूक नियोजन केले. या जलद कृतीमुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

