Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कोयना पाणलोट क्षेत्रात ढगफुटीसृदश पाऊस; धरणातून विसर्ग वाढणार

कोयना पाणलोट क्षेत्रात ढगफुटीसृदश पाऊस; धरणातून विसर्ग वाढणार

दैनिक स्थैर्य | दि. ३१ जुलै २०२६ | सातारा | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. धरणात ९० टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

त्यामुळे धरणातून विसर्ग वाढणार असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

शुक्रवारी मध्यरात्रीपासून नवजा, महाबळेश्वर, पाटण तसेच सातारा शहराच्या पश्चिमेला घाटमाथ्यावर सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. प्रशासनाकडून डोंगरमाथ्यावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya