Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मिरेवाडी: अजितदादांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण - आमदार सचिन पाटील यांचे आवाहन

मिरेवाडी: अजितदादांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण - आमदार सचिन पाटील यांचे आवाहन

मिरेवाडी येथे अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदर्श ग्रुपतर्फे वृक्षारोपण उपक्रम राबवून सामाजिक संदेश देण्यात आला.

स्थैर्य, मिरेवाडी, दि. २६ जुलै : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त फलटण तालुक्यातील मिरेवाडी (कुसूर) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आदर्श ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण उपक्रम पार पडला.

अजित पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन आमदार सचिन पाटील यांनी केले.

याप्रसंगी आमदार सचिन पाटील म्हणाले की, दिलेला शब्द पाळणारे आणि कामाला प्राधान्य देणारे नेते म्हणून अजित पवार यांची ओळख होती. त्यांच्या कार्याची आणि विचारांची शिदोरी सर्वांच्या पाठीशी आहे. सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्यांचा हाच कामाचा वारसा पुढे घेऊन जात आहेत.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि अजित पवार यांच्या आठवणी जतन करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. 'माझा ऑक्सिजन माझी जबाबदारी' हा दृष्टिकोन ठेवून समाजात कार्य करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास अमोल खराडे, बबन नरूटे, बापूसाहेब वाघमारे, अमोल शेळके, अक्षय खताळ, सचिन गाढवे, युवराज नरुटे, संदीप नरुटे, युवराज सस्ते, संदीप गोळे आणि विठ्ठल आंबोले यांच्यासह मिरेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya