Dailyhunt
मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल उज्ज्वल; विज्ञान शाखेची ९९.२७ टक्क्यांसह बाजी!

मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल उज्ज्वल; विज्ञान शाखेची ९९.२७ टक्क्यांसह बाजी!

लटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बारावी (HSC) बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. तिन्ही शाखांमधून एकूण ६६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शाळेने यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ५ मे : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या इयत्ता १२ वी (HSC) बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत मागील वर्षाप्रमाणेच निकालाची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राखली आहे.

एचएससी बोर्डाच्या परीक्षेसाठी महाविद्यालयातून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतून एकूण ७१७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तब्बल ६६८ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत.

विज्ञान शाखेतून एकूण ४१२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ४०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

वाणिज्य शाखेतून एकूण २१२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

कला शाखेतून एकूण ९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

या परीक्षेत उत्तम यश संपादन केलेल्या सर्व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार मा. श्री. दीपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.

तसेच, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी मा. अरविंद निकम, तपासणी अधिकारी मा. दिलीप राजगुडा, सहाय्यक तपासणी अधिकारी मा. सुधीर अहिवळे, प्रशालेचे प्राचार्य मा. वसंतराव शेडगे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य मा. सोमनाथ माने, माध्यमिकचे उपप्राचार्य मा. ए. वाय. ननवरे, माध्यमिकचे पर्यवेक्षक मा. राजेंद्र नाळे, मा. रावसाहेब निंबाळकर, पर्यवेक्षिका सौ. पूजा पाटील, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya