Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नायकाचीवाडी-वाकेश्वर रस्त्याची दुरावस्था

नायकाचीवाडी-वाकेश्वर रस्त्याची दुरावस्था

नायकाचीवाडी-वाकेश्वर रस्त्यावर भुजबळ वस्तीनजिक रस्त्यावर पडलेली ओघळ (छाया : समीर तांबोळी)


स्थैर्य, कातरखटाव, दि. १३ : वाकेश्वर - नायकाचीवाडी या अंदाजे दोन किलो मीटर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. योग्य वेळेत या रस्त्याची डागडूजी न झाल्यास रस्ता इतिहासजमा होण्याची शक्यता आहे.

या रस्त्यावर भूजबळ वस्तीनजीक मोठी ओघळ पडली आहे. या ओघळीत पाणी साचून मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे.

या चिखलातून नागरिकांना मार्ग काढणेही मुश्कील झाले आहे. तर दुचाकी वाहन धारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. याशिवाय येरळा नदीवर पूल नसल्याने नागरिकांना पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. तरी बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी दोन्ही गावांतील मान्यवर तसेच ग्रामस्थांनी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya