| नायकाचीवाडी-वाकेश्वर रस्त्यावर भुजबळ वस्तीनजिक रस्त्यावर पडलेली ओघळ (छाया : समीर तांबोळी) |
स्थैर्य, कातरखटाव, दि. १३ : वाकेश्वर - नायकाचीवाडी या अंदाजे दोन किलो मीटर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. योग्य वेळेत या रस्त्याची डागडूजी न झाल्यास रस्ता इतिहासजमा होण्याची शक्यता आहे.
या रस्त्यावर भूजबळ वस्तीनजीक मोठी ओघळ पडली आहे. या ओघळीत पाणी साचून मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे.

