Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
निंभोरे: जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

निंभोरे: जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

त्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या जयंतीनिमित्त निंभोरे येथील शाळेत गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. कुटुंबाचा एक लाख वह्या वाटपाचा संकल्प.

स्थैर्य, निंभोरे, दि. ०४ ऑगस्ट : पत्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या जयंतीनिमित्त निंभोरे (ता.

फलटण) येथील प्राथमिक शाळेत गरजू विद्यार्थ्यांना वह्या आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रा. आढाव यांच्या स्मरणार्थ राज्यभरातील गरजू विद्यार्थ्यांना एक लाख मोफत वह्या वाटप करण्याचा संकल्प त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कै. भाऊसाहेब दैठणकर प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुपुत्र बंडी यांनी प्रा. रमेश आढाव यांच्या कार्याला उजाळा दिला. प्रा. आढाव यांनी लोकसेवेचे प्रभावी माध्यम म्हणून पत्रकारितेचा वापर केला. वंचित आणि उपेक्षितांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला. त्यांच्या स्मरणार्थ सुरू असलेला शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम प्रेरणादायी आहे, असे बंडी यांनी नमूद केले.

शाळेचे अधीक्षक अनिल महामुनी यांनी प्रा. आढाव यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. त्यांच्या स्मरणार्थ आढाव कुटुंबीयांनी राज्यभरातील विद्यार्थ्यांना एक लाख वह्या मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा उपक्रम त्यांच्या विचारांना दिलेली खरी आदरांजली ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमानिमित्त आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर ऋषिकेश आढाव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप झाले. मोहनराव माळवे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी दस्तगीर पठाण, संजय इंगळे, चंदाराणी जगताप यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya