Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नीरा खोऱ्यात पावसाची संततधार; धरणांच्या पाणीसाठ्यात ७.७७ टीएमसीपर्यंत वाढ

नीरा खोऱ्यात पावसाची संततधार; धरणांच्या पाणीसाठ्यात ७.७७ टीएमसीपर्यंत वाढ

नीरा देवघर आणि गुंजवणी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून एकूण उपयुक्त साठा ७.७७ टीएमसीवर पोहोचला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ५ जुलै : नीरा उजवा कालवा विभागांतर्गत येणाऱ्या नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भाटघर, वीर, नीरा देवघर आणि गुंजवणी धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून, एकूण उपयुक्त पाणीसाठा ७.७७ टीएमसी म्हणजेच १६.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नीरा देवघर आणि गुंजवणी धरण क्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे. ताज्या आकडेवारीनुसार, नीरा देवघर धरण क्षेत्रात ६२ मिलिमीटर, तर गुंजवणी धरण क्षेत्रात ६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत नीरा देवघर परिसरात एकूण ४११ मिलिमीटर आणि गुंजवणीत ३६९ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

भाटघर धरण क्षेत्रात २६ मिलिमीटर पाऊस झाला असून येथील एकूण पाऊस २१६ मिलिमीटरवर पोहोचला आहे. वीर धरण क्षेत्रात १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण पाऊस १०२ मिलिमीटर झाला आहे. पाणलोट क्षेत्रात सर्वत्र पाऊस होत असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे.

नीरा प्रणालीतील धरणांमध्ये एकूण ७.७७ टीएमसी (१६.०८ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. यामध्ये भाटघर धरणात ३.०४ टीएमसी, वीर धरणात १.९४ टीएमसी, नीरा देवघरमध्ये २.०४ टीएमसी आणि गुंजवणी धरणात ०.७५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत या प्रणालीत १.०२५ टीएमसी पाणी नव्याने दाखल झाले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya