Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फलटण: ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन - शहरावर शोककळा

फलटण: ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन - शहरावर शोककळा

लटणचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन झाले आहे. ते शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. या वृत्ताने शहरावर शोककळा पसरली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १९ जुलै : फलटण येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन झाले आहे.

ते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि दिवंगत नेते सुभाष शिंदे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते.

सुभाष शिंदे यांच्या निधनानंतर नंदकुमार मोरे यांनी विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत राजकीय आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता. फलटणच्या राजकारणात व समाजकारणात त्यांनी सातत्याने काम केले.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण फलटण शहरावर शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील नागरिकांनी त्यांना आदरांजली वाहिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya