Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फलटणमध्ये राजकीय भूकंप! प्रमोद निंबाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश; राजे गटाला पुन्हा एकदा दणका

फलटणमध्ये राजकीय भूकंप! प्रमोद निंबाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश; राजे गटाला पुन्हा एकदा दणका

लटणमधील प्रसिद्ध व्यावसायिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

स्थैर्य, फलटण, दि. ०१ ऑगस्ट : फलटण शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, माळजाई उद्यान समितीचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) माजी शहराध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी आपल्या समर्थकांसह माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. फलटण शहराच्या राजकारणातील मोठा राजकीय फेरबदल मानला जात आहे.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमोद निंबाळकर यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. प्रवेशानंतर बोलताना प्रमोद निंबाळकर म्हणाले की, फलटण शहर व तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी अत्यंत निष्ठेने पूर्ण केली जाईल. आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत मिळून शहराच्या विकासाची कामे वेगाने केली जातील.

प्रमोद निंबाळकर हे फलटणच्या सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात एक परिचित नाव आहे. त्यांनी यापूर्वी फलटण नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाचे सभापती, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटरचे संस्थापक अध्यक्ष, तसेच लायन्स क्लबचे सचिव म्हणून कार्य केले आहे. राजकीय क्षेत्रात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपद आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीसपद यशस्वीपणे सांभाळले आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे भाजपची शहरात ताकद वाढणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya