Friday, 22 Jan, 9.23 pm स्थैर्य

होम
शेअर बाजारातील तेजी ओसरली; सेन्सेक्सची ७४६ अंकांनी घसरण

स्थैर्य, मुंबई, दि.२२: आज सलग दुस-या दिवशी नफा बुकिंग केलेल्या बेंचमार्क निर्देशांकांत घसरण झाली. मेटल आणि वित्तीय स्टॉक्समुळे बाजाराने घसरण अनुभवली. निफ्टी १.५०% किंवा २१८.४५ अंकांनी खाली घसरला व १४,४९९ पाततळीच्या खाली १४,३७१.९० अंकांवर पोहोचला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १.५०% किंवा ७४६.२२ अंकांनी घटून ४८,८७८.५४ अंकांवर स्थिरावला. आज जवळपास ९६० अंकांनी वृद्धी घेतली, १,९६१ शेअर्स घसरले तर १३२ शेअर्स स्थिर राहिले.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की, आजच्या व्यापारी सत्रात बजाज ऑटो (११.२३%), हिरो मोटोकॉर्प (३.९९%), आयशर मोटर्स (१.७८%), हिंदुस्तान युनिलिव्हर (१.४५%) आणि अल्ट्राटेक सिमेंट (०.६७%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. याउलट अॅक्सिस बँक (४.४८%), एशियन पेंट्स (४.२५%), जएसडब्ल्यू स्टील (३.९७%), आयसीआयसीआय बँक (३.७५%) आणि हिंडाल्को इंडस्ट्रीज (३.७४%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.

निफ्टी बँक, मेटल आणि पीएसयू हे क्षेत्र प्रत्येकी ३ टक्क्यांनी वधारले तर ऊर्जा, फार्मा आणि इन्फ्रा क्षेत्रात प्रत्येकी १ टक्क्यांनी घट झाली. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप अनुक्रमे १.१९% आणि १.०४% नी घटले.

मंगलम ऑर्गेनिक्स लि.: मंगल ऑर्गेनिक्सच्या शेअर्समध्ये १६.३१% ची वाढ झाली व त्यांनी ५५५.७५ रुपयांवर व्यापार केला. डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ३० कोटी रुपयांनी वाढला. कंपनीचा महसूल याच काळात वाढूनन १०८ कोटी रुपयांपर्यंत गेला.

सिंफनी लि.: सिंफनी लि.च्या शेअर्समध्ये ४.८९% ची घसरण झाली व त्यांनी ९९०.०० रुपयांवर व्यापार केला. कंपनीचा निव्वळ नफा ४७.१% नी घसरला व तो २७ कोटी रुपये झाला. तर महसुलातही २५.५% ची घट झाली व तो २१६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.

बायोकॉन लि.: बायोकॉनच्या शेअर्समध्ये ११.०५% नी वाढ झाली व त्यांनी ३९३.१० रुपयांवर व्यापार केला. कंपनीने २०२१ या वित्त वर्षातील तिसऱ्या तिमाहित एकत्रित निव्वळ नफ्यात १८% ची वाढ दर्शवली व तो १८६.६ कोटी रुपये झाला.

बजाज ऑटो लि.: बजाज ऑटोचे शेअर्स ११.२३% नी वाढले व त्यांनी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठत ४.११९.२५ रुपयांवर व्यापार केला. कंपनीने आतापर्यंतचा सर्वोच्च नफा अनुभवला. डिसेंबरच्या तिमाहीत बजाज ऑटोचा स्वतंत्र नफा २३ टक्क्यांनी वाढून १५५६.२८ कोटी रुपयांवर पोहोचला.

जेके टायर व इंडस्ट्रिज लि.: कंपनीचे स्टॉक्स १९.९७% नी वाढले व त्यांनी १३८.८० रुपयांवर व्यापार केला. कंपनीने एकत्रित निव्वळ नफफ्यात अनेक पटींनी वाढ नोंदवल्यावर हे परिणाम दिसले. वित्तवर्षी २०२१ मधील तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा २३०.४६ कोटी रुपये झाला तर कंपनीचा एकत्रित महसूल २७६९.२८ कोटी रुपये झाला.

भारतीय रुपया: देशांतर्गत इक्विटी बाजारात प्रॉफिट बुकिंग झाल्याने भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७२.९७ रुपयांचे मूल्य कमावले.

जागतिक बाजारपेठ: अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून अतिरिक्त प्रोत्साहनाची आशा असल्याने गुंतवणूकदारांनी नफा उचलला व त्यामुळे आशियाई व युरोपियन बाजार घसरला. एफटीएसई १०० चे शेअर्स ०.९४% नी घसरले तर एफटीएसई एमआयबीचे शएअर्स २.२१% नी घटले. निक्केई २२५ चे शेअर्स ०.४४% तर हँगसेंगचे शेअर्स १.६०% नी घसरले.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya
Top