Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
स्पर्धा परीक्षेत व्हिजन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश; गुणवंतांचा सत्कार

स्पर्धा परीक्षेत व्हिजन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश; गुणवंतांचा सत्कार

कोळकी येथील व्हिजन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी MTS, मंथन आणि NMMS परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला.

स्थैर्य, फलटण, दि. ०३ सप्टेंबर : कोळकी (ता.

फलटण) येथील व्हिजन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी MTS, मंथन तसेच NMMS या स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रकाश शिंदे आणि सामाजिक कार्यकर्ते हणमंत शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

NMMS परीक्षेत प्रांजल येळे हिने यश मिळवले. मंथन परीक्षेत अक्षरा पखाले, शौर्यराज जगताप, प्रांजल येळे, राजवर्धन घोंगडे आणि कैवल्य बोरावके यांनी गौरवचिन्ह पटकावले. MTS परीक्षेत राज साळुंखे, शंभूराज लोंढे, शिवन लोंढे, प्रांजल येळे, अपेक्षा मोरे, यश महाजन, अक्षरा पखाले, प्रणव शिंदे आणि आरोही मोरे यांनी सुवर्णपदक मिळवले. रियांश पिसाळ, राजवर्धन घोंगडे, कैवल्य बोरावके आणि यशवर्धन जाधव यांनी ट्रॉफी मिळवत यश संपादन केले.

विद्यार्थ्यांना सुशांत घाडगे यांच्यासह दिपाली पवार, सचिन खरात, अश्विनी कुलाळ आणि मेघा घाडगे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी भूगोलात पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल प्रा. डॉ. प्रकाश शिंदे यांचा अकॅडमीतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवू शकतात, असा विश्वास पालकांनी व्यक्त केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya