Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'टेस्ट ड्राईव्ह'च्या बहाण्याने थार घेऊन पसार झालेल्या आरोपीस सोलापुरात अटक

'टेस्ट ड्राईव्ह'च्या बहाण्याने थार घेऊन पसार झालेल्या आरोपीस सोलापुरात अटक

दैनिक स्थैर्य | दि. २६ जुलै २०२६ | सातारा | सातारा शहरातील महिंद्रा शोरूममधून 'थार' गाडी खरेदी करण्याचे सांगून टेस्ट ड्राईव्ह करण्याच्या बहाण्याने वाहन नेऊन परत न करता फसवणूक करणार्‍या सोहेल अफजल बागवान (वय २८ रा.

पंढरपूर, जि. सोलापूर) या सराईत आरोपीला सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) पथकाने सोलापूर येथून अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी ३२ लाख रुपये किमतीच्या दोन थार गाड्या जप्त केल्या आहेत.

या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ५ जुलै रोजी सातारा शहरातील महिंद्रा शोरूममधून आरोपी सोहेल बागवान याने थार वाहन खरेदी करण्याचे सांगून टेस्ट ड्राईव्हसाठी वाहन घेऊन तो पसार झाला. ते वाहन परत न केल्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

डीबी पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे आरोपीची ओळख निश्चित केली. त्यानंतर सोलापूर शहरातून सोहेल अफजल बागवानने चौकशीदरम्यान आरोपीने सातारा शहर तसेच पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच पद्धतीने थार वाहने फसवणुकीने नेल्याची कबुली दिली. त्यानुसार एकूण ३२ लाख किंमतीची दोन थार वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya