Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
व्हीआयविरोधात एअरटेल आणि जिओची तक्रार; ट्रायने सुरू केली चौकशी

व्हीआयविरोधात एअरटेल आणि जिओची तक्रार; ट्रायने सुरू केली चौकशी

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी नियमांचे उल्लंघन करून ग्राहक पळवल्याचा आरोप करत एअरटेल आणि जिओने वोडाफोन-आयडियाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १५ सप्टेंबर : देशातील दूरसंचार क्षेत्रात पुन्हा एकदा मोठी घडामोडी समोर आली असून भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांनी प्रतिस्पर्धी कंपनी वोडाफोन-आयडिया (Vi) विरोधात गंभीर आरोप केले आहेत.

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन करून आणि दिशाभूल करणाऱ्या पद्धतींचा वापर करून ग्राहक आपल्या नेटवर्कवर आणले जात असल्याची तक्रार ट्राय (TRAI) कडे करण्यात आली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने चौकशी सुरू केली आहे.

जिओ आणि एअरटेलच्या आरोपानुसार, वोडाफोन-आयडियाचे प्रतिनिधी इतर कंपन्यांचे अधिकारी असल्याचे भासवून ग्राहकांना फोन करत आहेत. लवकरच दर वाढणार असल्याचे सांगून त्यांना व्हीआयमध्ये पोर्ट होण्यास प्रवृत्त केले जात आहे. तसेच, युनिक पोर्टिंग कोड (UPC) मिळवण्यासाठी १९०० वर पाठवण्यात येणारे मेसेज काही वर्तुळात रोखले जात असल्याचा आरोप करण्यात आला असून, सवलतीच्या दरातील पोस्टपेड प्लॅन्सचे नियमबाह्य प्रमोशन केले जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

ट्रायचे अध्यक्ष ए. के. लाहोटी यांनी सांगितले की, दूरसंचार कंपन्यांकडून आलेल्या तक्रारींची चौकशी केली जात असून नियमानुसार पुढील कारवाई होईल. दुसरीकडे, वोडाफोन-आयडियाच्या प्रवक्त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपण सर्व कायदे आणि नियमांचे पालन करूनच व्यवसाय करत असून बाजारात निरोगी स्पर्धेवर विश्वास ठेवतो, असे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya