Dailyhunt
विडणीचे सुपुत्र मयूर अभंग यांची 'पोलीस उपनिरीक्षक' (PSI) पदी निवड; ग्रामस्थांमधून अभिनंदनाचा वर्षाव

विडणीचे सुपुत्र मयूर अभंग यांची 'पोलीस उपनिरीक्षक' (PSI) पदी निवड; ग्रामस्थांमधून अभिनंदनाचा वर्षाव

लटण तालुक्यातील विडणी गावचे सुपुत्र मयूर नंदकुमार अभंग यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल विडणी व परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १ मे : फलटण तालुक्यातील विडणी गावचे सुपुत्र आणि स्वर्गीय कृष्णराव अभंग (उर्फ गांधी अण्णा) यांचे नातू, मयूर नंदकुमार अभंग यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेतून त्यांची 'पोलीस उपनिरीक्षक' (PSI) या मानाच्या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशाने विडणी गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

मयूर अभंग यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा विद्यानगर, विडणी येथे झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षण उत्तरेश्वर हायस्कूल, विडणी येथे पूर्ण केले. तर, पुढील पदवीचे शिक्षण त्यांनी 'यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक' (YCMOU) येथून यशस्वीरीत्या पूर्ण केले.

मयूर अभंग यांनी एमपीएससी (MPSC) परीक्षेत मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुंबई मंत्रालय येथील अवर सचिव धीरज अभंग, फलटण पंचायत समितीचे सदस्य सचिन (अध्यक्ष) अभंग, विडणी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सागर (भैय्या) अभंग, तसेच विडणीचे सर्व ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून मयूर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya