Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
व्यावसायिकांना दिलासा : एलपीजी सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त

व्यावसायिकांना दिलासा : एलपीजी सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त

दैनिक स्थैर्य | दि. २ ऑगस्ट २०२६ | नवी दिल्ली | केंद्र सरकारकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून इंधनाचे सुधारित दर जाहीर केले जातात. त्यातच आता व्यावसायिकांसाठी दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात केली. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर २०० रुपयांपेक्षा जास्त किमतीने कमी झाला आहे.

कोलकातामध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात २०९ आणि दिल्लीमध्ये २०२ ने कपात करण्यात आली आहे. या बदलानंतर, कोलकातामध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आजपासून २८७२.५० असेल. यापूर्वी, १ जुलै रोजी तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात १८३.५० ने कपात केली होती.

घरगुती सिलेंडरचे दर 'जैसे थे'च
१ ऑगस्ट रोजी, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत २०० रुपयांपेक्षा जास्त कमी करण्यात आली होती. हे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. मात्र, घरगुती स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत मात्र तशीच राहिली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होणार?
व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमती कमी झाल्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार का याबाबत सर्वसामान्यांमध्ये चर्चा सुरु आहे. गॅसच्या किमती कमी झाल्यामुळे, येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. याचे एक कारण म्हणजे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट. मात्र, तेल कंपन्या किंवा सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya