Wednesday, 13 Jan, 6.42 pm Stocks Marathi

Posts
आजच मार्केट १३ जानेवारी २०२१

मागील 3 दिवसाच्या वाढीनंतर आज सेन्सेक्समध्ये घसरण झाली. सकाळी बाजार उघडताच सेनसेक्समध्ये 250 अंकांची वाढ झाली होती. तर निफ्टीने 14600 पर्यंत मजल मारली. Bharti Airtel मध्ये 5% ची तर, ONGC मध्ये 2% ची वाढ होऊन बाजार उघडला. सकाळी बाजारात 30 पैकी 21 कंपन्या नफ्यात उघडल्या होत्या.

US बाजार काल नफ्यात बंद झाला. रुपयांमध्ये 15 पैशांची घसरण झाली. तर आशियाई बाजार नफ्यात चालू झाले होते. Brent crude च्या किमती फेब्रुवारी नंतर पहिल्यांदाच वाढल्या होत्या. Infosys, Wipro, CESC, GTPL Hathway या महत्वाच्या कंपन्यांचे आज तिमाही निकाल होते. सकाळी Wipro मध्ये समाधानकारक वाढ होती. तर Infosys मध्ये घट झाली होती. Tata Elxsi च्या सकारात्मक निकालानंतर शेअर्स 11% नि वाढले.

दुसरीकडे Larsen & Toubro ला ऑर्डर भेटल्याचा चर्चेनंतर शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तर India VIX मध्ये सुद्धा 2% ची वाढ झाली. दुपारी Banking शेअर्स नफ्यात वाढत होते. Bank of Baroda 3.75% च्या वाढीसह आघाडीवर होता. तर दुसरीकडे Financial services चे शेअर्स तोट्यात गेले. Housing Development Finance Corporation मध्ये 3.38% ची घट झाली.

Tata Elxsi या कंपनीचा शेअर आज 13% ने वाढला असून काल कंपनीचा तिमाहीचा निकाल लागला होता, त्यामध्ये कंपनीला 39.5 % चा नफा झालेला होता त्यामुळे शेअर मध्ये वाढ पाहायला मिळाली आहे.

IRFC चा IPO बाजारात 18 जानेवारी ला येणार आहे. त्याची किंमत 25 ते 26 रुपये प्रति शेअर असणार आहे.

Tourism and Hospitality Space मध्ये चढ उतार चालू होता. Indian Hotels Company मध्ये 2.68% ची वाढ झाली. तर Mahindra Holidays & Resorts India मध्ये 1.66% ची उचल भेटली आहे. V Mart Retail मध्ये 4.75% ची घट झाली आहे. pharma space मध्ये Jubilant Life Sciences ने 5.94% ची वाढ घेतली तर Ajanta Pharma मध्ये 2.87% ची घट झाली आहे. AstraZeneca Pharma India देखील 2.48% नि कमी झाली.

Infosys या कंपनीचा आज ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीचे निकाल जाहीर झाला, यामध्ये कंपनीच्या नफ्यामध्ये म्हणजेच Profit मध्ये 16.8% ची वाढ झाली असून तो 5215 करोड झाला आहे,याचा परिणाम शेअर मध्ये उद्या वाढ पाहायला मिळू शकते. तसेच Wipro या IT कंपनीचा देखील तिमाहीचा निकाल जाहीर झाला, यामध्ये देखील प्रॉफिट मध्ये 21% ची वाढ होऊन तो 2967 करोड झाला आहे.

शेवटी बाजार बंद होताना, सेन्सेक्समध्ये 24 अंकांची घट होऊन सेन्सेक्स 49492 अंकांवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये 1 अंकांची वाढ होऊन निफ्टी 14564 अंकांवर बंद झाला. M&M मध्ये 6% ची वाढ झाली तर , SBI मध्ये दिवसअखेर 5% ची उचल नोंदवली गेली. Telecom Sector मध्ये सर्वाधिक 1.32% ची वाढ झाली.

आजच्या वाढलेल्या कंपन्या-: M&M (5.74%), SBI (4.53%), ITC (2.40%)

आजच्या कमी आलेल्या कंपन्या-:Bajaj Finance (3.03%), HDFC (2.66%), Bajaj Finserv (1.91%)

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Stocks Marathi
Top