Tuesday, 19 Jan, 6.53 pm Stocks Marathi

Posts
आजच मार्केट १९ जानेवारी २०२१

मागील 3 दिवस बाजारात घट झाल्यानंतर आज बाजाराने झेप घेतली. आज सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 300 अंकांची वाढ झाली. तर निफ्टी 14380 वर होता.ONGC आणि SBI मध्ये प्रत्येकी 2% ची वाढ झाली. सकाळी 30 पैकी 30 कंपन्या नफ्यात उघडल्या.

डॉलरची किंमत कमी होत असल्याने रुपयांमध्ये 21 पैशांची घसरण पाहायला मिळाली. काल अमेरिकेन बाजार बंद असला तरी आज आशियाई बाजारात वाढ झाली होती. Man Industries (India) ला 250 करोडची ऑर्डर भेटली आहे. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 2.18% ची वाढ झाली होती. Financial सेक्टर मध्ये PSU Bank लीड करताना दिसत आहे. सकाळी Grasim Industries मध्ये 4% पेक्षा जास्त वाढ झाली होती. तर काल तोट्यात असलेला Tata Motors चा शेअर आज 3.70% नि वाढला. तर SBI Life Insurance Company मध्ये 2% नि वाढला होता.

तर Britannia Industries ,HDFC Bank ,ITC ,Mahindra & Mahindra मध्ये घट झाली होती. सकाळपासून Reliance Industries, HDFC, TCS, Infy चांगलेच वाढले.त्यामुळे बाजार सकाळपासून तेजीत होता. पहिल्या सत्रात सर्व क्षेत्र नफ्यात होते. Metal, PSU bank, Realty हे क्षेत्र आज आघाडीवर होते. तर दुपारपर्यंत Midcap आणि Smallcap 1.5% नि प्रत्येकी वाढला. Cholamandalam Investment & Finance Company मध्ये 8% पर्यंत वाढ झाली. तर त्यांचा नवीन Partner Shriram Transport Finance Company मध्ये 5% ची वाढ झाली.

कार किंमतीत वाढ होत असल्याने Maruti Suzuki आणि Tata Motors मध्ये वाढ झाली आहे. Bajaj Finserv, Bajaj Finance मध्ये प्रत्येकी 5% ची उचल भेटली आहे. बजाज च्या दोन्ही कंपन्यांचे उद्या निकाल असल्याने शेअर मध्ये आज वाढ पाहायला मिळाली. Nifty Realty क्षेत्रात 4% ची वाढ झाली आहे. Mindtree च्या तिसऱ्या सत्राच्या निकालानंतर 6% ची वाढ झाली. Indian Railway Catering & Tourism Corporation मध्ये 1.38% ची वाढ झाली आहे. IRFC चा IPO दुसऱ्या दिवशीच पूर्ण Subscribe झाला आहे.

Indiabulls Real Estate मध्ये आज ११% ची वाढ पाहायला मिळाली, कंपनीला ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत ६४% ची झाली असून तो ८०.६९ करोड झाला आहे.

Indigo Paints या कंपनीचा IPO उद्या बाजारात येत आहे. हा IPO ११७६ करोड चा असून Price Band हे १४८८-१४९० ठेवले आहे. कंपनीचा Revenue आणि Profit मध्ये वाढ दिसत आहे. २०१८ मध्ये कंपनीला १२८.६२ करोड चा नफा म्हणजेच प्रॉफिट झाला होता तोच २०२० मध्ये ४७८ करोड झाला आहे.एका लॉट मध्ये आपल्याला १० शेअर्स या IPO मधून मिळणार आहेत. २८ जानेवारी ला या IPO चे Allotment असून २ फेब्रुवारी ला शेअर बाजारात येणार आहे.

शेवटी दिवस अखेर बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 834 अंकांची वाढ होऊन सेन्सेक्स 49398 अंकांवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये 239 अंकांची वाढ होऊन निफ्टी 14521 अंकांवर बंद झाला. आज REALTY सेक्टर 4% नि सर्वाधिक वाढले. तर FMCG आज 0.64% नि खाली आला.

आजच्या वाढलेल्या कंपन्या-: Bajaj Finserv (6.77%), Bajaj Finance (5.36%), Sun Pharma (3.54%)

आजच्या कमी झालेल्या कंपन्या-: TechM (0.30%), ITC (0.18%), M&M (0.02%)

उद्याचे तिमाहीचे निकाल :-

 1. Bajaj Finance
 2. Bajaj Finserv
 3. Hunustan Zinc
 4. HDFC AMC
 5. Havells India
 6. L&T Technology Services
 7. The Fedral Bank
 8. VST Industries
 9. Sterlite Technologies
 10. GMM Pfaudler
 11. Phillips Carbon Black
 12. Newgen Software Technology
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Stocks Marathi
Top