Thursday, 21 Jan, 10.09 pm Stocks Marathi

Posts
आजच मार्केट २१ जानेवारी २०२१

आज बाजारात इतिहास घडला. भारतीय शेअर बाजारात आज पहिल्यांदा सेन्सेक्सने बाजार उघडताच 50 . हजाराचा टप्पा पार केला. सेन्सेक्स आज 50,000 च्या वर जाऊन पुन्हा बाजार बंद होताना 50,000 च्या खाली आला. तर सकाळी निफ्टी 14700 च्या वर होता. Jk tyre मध्ये सकाळीच 9% वाढ झाली आहे. तर सकाळी 30 पैकी 27 कंपन्या नफ्यात उघडल्या.

काल जो बिडेन यांनी अमेरिकन राष्ट्रपती पदाची शपत घेतली आणि अमेरिकन बाजाराने त्यांचे जोरदार स्वागत केले. अमेरिकन बाजार काल ऐतिहासिक उंचीवर होता. आशियाई बाजार देखील आज वाढला होता. Indigo Paints चा IPO पहिल्या दिवशी 1.9x ने Subscribe झाला आहे. पहिल्या सत्रात Reliance, Bajaj Finance, ICICI, Axis Bank यांनी उचल घेतली होती. Tata Motors मध्ये 7.64% ची मोठी वाढ झाली होती. बाजार बंद होताना देखील Tata Motors 5% च्या वर गेला होता. Bajaj Finserv देखिल 4.72% ची वाढ झाली. तर bajaj finance 4.43% नि वाढला होता. MRF हा मोठा शेअर देखील 2.52% ची मोठी वाढ झाली.

काल प्रमाणे आज देखील Nifty Auto index 2% नि वाढला आहे. तर Metal, Real Estate मध्ये घट चालू आहे. Hindustan Zinc मध्ये 3.10% ची घट झाली तर , Steel Authority of India (SAIL) मध्ये सुद्धा 2.25% ची घट झाली आहे. Raymond मध्ये 1% ची घसरण झाली आहे. Tourism and Hospitality Space मध्ये मिश्र स्थिती होती. Indian Hotels Company मध्ये 1% ची वाढ तर ,Westlife Development मध्ये 2% ची घट झाली. Bajaj auto ला 3ऱ्या सत्राच्या निकालात 23% चा फायदा झाल्याने शेअर्समध्ये 3% ची वाढ झाल्याचे दिसून आले.

Indigo Paints या कंपनीच्या IPO चे Subscription आज दुसऱ्या दिवशी ७. ३६ पट झाला आहे.

Havells India या कंपनीच्या शेअर मध्ये आज १०% ची वाढ झाली असून कंपनीला ऑक्टोबर डिसेंबर या तिमाहीत प्रॉफिट मध्ये ७४% ची वाढ झाल्याने असे झाले आहे.

शेवटी बाजार होताना सेन्सेक्समध्ये 167 अंकांची घट होऊन सेन्सेक्स 49624 अंकांवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये 54 अंकांची घट होऊन निफ्टी 14590 अंकांवर बंद झाला. सकाळी 30 पैकी 10 कंपन्या नफ्यात होत्या.

आजच्या वाढलेल्या कंपन्या :- Tata Motors(5.71%), Bajaj Finance(2.74%), Reliance(2.18%), Bajaj Auto(1.63%)
आजच्या कमी झालेल्या कंपन्या :- ONGC(4.20%), Tata Steel (3.40%), GAIL(3.08%), Coal India(2.93%)

उद्याचे तिमाहीचे निकाल :-

  1. Reliance Industries
  2. HDFC Life Insurance
  3. SBI Life Insurance
  4. Yes Bank
  5. Gland Pharma
  6. Crompton Greaves
  7. Oberoi Realty
  8. Indian Bank
  9. Symphony Ltd
  10. Century textiles & Industries Ltd
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Stocks Marathi
Top