Dailyhunt

अमळनेरच्या जैतपीर येथे भीषण अपघात; पिकअप वाहन पलटी, १० पेक्षा अधिक जखमी, थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.!

ळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील जैतपीर गावाजवळ शुक्रवारी रात्री घडलेल्या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पिकअप वाहन पलटी होऊन त्यातील १० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 3 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास पिकअप वाहन चालक ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. याचवेळी रस्त्यावर अचानक आलेल्या स्पीडब्रेकरचा अंदाज न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटताच पिकअप वाहन रस्त्यावरच पलटी झाले.

या वाहनात सुमारे १० ते १५ जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की, वाहन पलटी होताच त्यातील १० ते ११ जण रस्त्यावर फेकले गेले. त्यामुळे अनेक प्रवाशांना दुखापती झाल्या आहेत.

दरम्यान, या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे. या फुटेजमध्ये पिकअप वाहन अचानक पलटी होताना आणि त्यातील प्रवासी बाहेर फेकले जाताना स्पष्ट दिसत आहे. या दृश्यांमुळे अपघाताची भीषणता अधिक स्पष्ट झाली आहे.

जैतपीर मधील या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इतर जखमींवर स्थानिक स्तरावर उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाहतूक नियमांचे पालन आणि रस्त्यांवरील सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon