Dailyhunt

भुसावळात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या नाशिकच्या तरुणास अटक

भुसावळ शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक येथील हा तरुण श्रीराम नगर परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले.

संदीप सुनील जाधव (वय 23, रा. कुमावत नगर, सहजयश अपार्टमेंट, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे 20 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा आणि सुमारे एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याला श्रीराम नगर परिसरात संशयास्पद हालचालींबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने 2 एप्रिल रोजी रात्री सुमारे पावणेअकराच्या सुमारास तातडीने कारवाई करून संशयिताला ताब्यात घेतले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात अवैध शस्त्रांच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी शहरातील गस्त आणि तपासणी अधिक कडक करण्यास सुरुवात केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon