Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

धरणगावात FDA ची मध्यरात्री छापेमारी; भेसळयुक्त दुधाचा काळाबाजार उघड, पोमोलीन तेल मिसळून तयार होत होते बनावट दूध.

ळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात भेसळयुक्त दूध विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रिफाइंड पोमोलीन तेलाचा वापर करून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा पथकाने भवरखेडे येथे मध्यरात्री छापेमारी करत मोठी कारवाई केली.

या प्रकरणी सोमनाथ आनंद माळी याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ तसेच बीएनएसच्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

तपासादरम्यान संशयित आरोपी रिफाइंड पोमोलीन तेलापासून तयार केलेले कृत्रिम दूध चांगल्या दुधात मिसळत असल्याचे समोर आले. तसेच दुधातील फॅट कृत्रिमरीत्या वाढवून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

भेसळयुक्त दूध विक्रीमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने घटनास्थळी कारवाई करत सुमारे दोन हजार लिटर संशयित दूध नष्ट केले. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon