Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

डॉक्टर, नर्सना मारहाण करणं भोवलं; शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रेसह तिघ सहकाऱ्यांना अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी.!

ल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकेला कथित मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना आणि अन्य तीन आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणातील कथित मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली. त्यानंतर विधानसभेत विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारकडे संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. पोलिसांनी या प्रकरणात रमेश पवार, अक्षय करांडे आणि प्रमोद निकम या तिघांनाही अटक केली आहे. सर्व आरोपींना विष्णूनगर पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांनी आरोपींविरुद्ध सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करणे, डॉक्टरांना धमकावणे तसेच इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांच्या घटनांबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी विविध डॉक्टर संघटनांकडून करण्यात येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon