Dailyhunt

डोसा खाल्ल्यामुळे दोन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू? आई-वडिलांची प्रकृती गंभीर. धक्कादायक घटनेने परिसर हळहळला.!

डोसा खाल्ल्यामुळे दोन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत मुलींच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. कुटुंबीय ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे त्या परिसरातील एका डेअरी मधून डोसा बनवण्यासाठी डोशाचं रवन आणलं होतं.

डोसा हा सर्वांचा अत्यंत आवडता पदार्थ आहे. आणि आपण डोशाचे अनेक वेगवेगळे प्रकार हे खाल्लेले सुद्धा आहे. डोसा हा दक्षिणेतला सर्वात प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. ज्याला खाल्ल्याशिवाय अनेकांना राहावलं जात नाही. अनेक लोक हे डोसा खाण्यासाठी तुटून पडतात. मात्र याच डोशामुळे दोन लहान निरागस चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आला आहे. तर या चिमुकल्यांच्या आई वडिलांची प्रकृती देखील गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. गुजरात राज्यातल्या अहमदाबाद येथील चांदखेडा परिसरात ही घटना घडलेली आहे. डोसा खाल्ल्यानंतर दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप हा कुटुंबीयांकडून केला जात आहे मात्र डोशामुळे चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला हे अजून अधिकृत कुठेही स्पष्ट झालेलं नाही.

दिनांक १ एप्रिलच्या रात्री चांदखेडा परिसरात त्यांच्या घरानजीक असलेल्या आयओसी रोडवरील एका डेअरी मधून डोसा बनवण्यासाठी रवण विकत घेतलं आणि त्या रात्री या कुटुंबाने डोसे बनवून खाल्ले. परत दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच रवणाचे डोसे बनवले व संपूर्ण कुटुंबातील सदस्यांनी ते खाल्ले व सर्व सदस्यांना उलट्यांचा त्रास जाणवू लागला. कुटुंबातील सर्व सदस्य हे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. याबाबत मृत चिमुकल्या मुलींचे आजोबा गौरीशंकर प्रजापती यांनीही माहिती दिली. सदर कुटुंबात विमल त्यांची पत्नी भावना आणि दोन लहान मुली यांनी हा डोसा खाल्ला होता. उपचारादरम्यान 4 एप्रिल रोजी आधी तीन महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला त्यानंतर 5 एप्रिल रोजी चार वर्षांच्या चिमुकलीने प्राण गमावले. व या दोन्ही चिमुकल्यांच्या आई-वडिलांचे प्रकृती ही अजूनही गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

अहमदाबाद नगरपालिकेच्या अन्न व पुरवठा विभागाने याबाबतचा तपास सुरू केलेला आहे. तसंच पोलिसांच्या उपस्थितीत चांदखेडा परिसर असलेल्या त्या डेअरी मधून काही नमुने घेऊन फॉरेन्सिक तपासणीसाठी देखील पाठवण्यात आलेले आहे. अन्न व पुरवठा अधिकारी डॉ. तेजस शहा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सदर घटनेबाबत चांदखेडा पोलिसात गुन्हा नोंदवून दोन्ही चिमुकल्या मुलींवर शवविच्छेदन करण्यात आलं. आणि आता शवविच्छेदन व एफ एस एल रिपोर्ट आल्यानंतरच चिमुकल्या मुलींचं मृत्यूच खरं कारण हे समजणार आहे. सध्या डोसा खाल्ल्यामुळेच हे झालं असं म्हणणं हे घाईच ठरणार असं मत पोलिसांनी व्यक्त केल आहे.

मात्र या संपूर्ण प्रकाराबाबत चांदखेडा परिसरात असलेल्या डेअरी मालकाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्या मालकाने असं म्हटलं आहे की, मी त्या दिवशी १०० किलो पेक्षा जास्त ते रवन विकलं पण अन्य कुठल्याही ग्राहकाने याबाबत कोणतीही तक्रार केलेली नाही. ही घटना घडल्यानंतर मी इतर ग्राहकांची सुद्धा संपर्क केला त्यांनीही रवनपासून खाद्यपदार्थ बनवले व खाल्ले मात्र त्यांना कुठलाही त्रास झालेला नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon