Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

एमपीएससी पेपरफुटी: प्रवीण पाटीलला घेऊन मुंबई पोलीस रवाना, नंदुरबारात स्पॉट पंचनामा..

नंदुरबार - एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणातील मुख्य संशयित आणि कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने तपासासाठी नंदुरबारमध्ये आणले होते.

पथकाने प्रवीण पाटील यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा सविस्तर स्पॉट पंचनामा पूर्ण केला.

या प्रकरणातील संशयित ऋतुजाचे वडील अमृत पाटील आणि तिचा मित्र गौरव पाटील यांच्या घरांचीही पोलिसांनी दिवसभर कसून झाडाझडती घेऊन चौकशी केली.

मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने महत्त्वाचे पुरावे गोळा करत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली. दिवसभराच्या सखोल चौकशी आणि तपासानंतर पोलीस पथक आरोपी प्रवीण पाटीलला ताब्यात घेऊन पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.

या पेपरफुटी प्रकरणामुळे राज्यभरातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये संताप असून पुढील तपास मुंबई गुन्हे शाखा करीत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon