Dailyhunt

हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी बलोपासना आवश्यक - गजानन तांबट हनुमान जयंतीनिमित्त 40 ठिकाणी गदा पूजन

ळगाव : श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जळगाव शहरासह ग्रामीण भागातील विविध ठिकाणी गदा पूजनाचा धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. जिल्ह्यातील सुमारे ४० हनुमान मंदिरांमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६ वाजता पंचमुखी हनुमान मंदिरात जलमहोत्सवाने झाली. भाविकांच्या उपस्थितीत गदा पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री अन्नदाता हनुमान मंदिर, दानाबाजार येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन सोहळा पार पडला. यावेळी भाजप प्रदेश सचिव सौ. भैरवी पलांडे, दानाबाजार व्यापारी असोसिएशनचे अशोक धूत, नगरसेवक विजय बांदल, राजेंद्र पांडे, दिनेश तिवारी, हिंदू जनजागृती समितीचे निखिल कदम तसेच भाजप युवा मोर्चाचे हर्षल सिखवाल उपस्थित होते.

असोदा येथील जागृत देवस्थान समिती तसेच श्रीराम पेठ येथील हनुमान मंदिरातही गदा पूजन करण्यात आले. या ठिकाणी ४०० हून अधिक भाविकांनी सहभाग नोंदवला.

याचप्रमाणे श्रीधर नगर, जागृती हौसिंग सोसायटी, सुप्रीम कॉलनी, चौगुले प्लॉट, छत्रपती शिवाजी महाराज नगर, अयोध्या नगर, भोईटे नगर, खोटे नगर, एमआयडीसी परिसर, अष्टविनायक माता मंदिर (पिंप्राळा) तसेच यावल, चोपडा, धरणगाव, एरंडोल आणि पारोळा येथेही गदा पूजनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी गजानन तांबट यांनी "हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी बलोपासना आवश्यक आहे," असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाद्वारे धार्मिक एकात्मता आणि संस्कृतीविषयी जागृती करण्याचा संदेश देण्यात आला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon