Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

ईद मिरवणुकीत नेमकं काय घडलं? लालबाग-परळमध्ये पोलिसांसह काही जण जखमी; तिघांवर गुन्हा

दच्या मिरवणुकीदरम्यान लालबाग-परळ परिसरात दोन गटांमध्ये वाद होऊन झटापट झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री नाकाबंदी सुरू असताना हा प्रकार घडला. परिस्थिती नियंत्रणात आणताना काही पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. बी. ए. रोडवरील परळ वर्कशॉपसमोर रात्री साडेअकराच्या सुमारास नाकाबंदी करण्यात आली होती. मोठ्या आवाजाचे हॉर्न आणि मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांकडून कारवाई सुरू होती. यावेळी काही दुचाकीस्वार पुढे जाऊन रस्त्यावर थांबल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

यानंतर घोषणाबाजी सुरू झाल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले. दरम्यान, लक्ष्मी कॉटेज परिसरातील काही तरुणही घटनास्थळी जमा झाले. दोन्ही गटांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला आणि त्याचे रूपांतर झटापटीत झाले. या वेळी झेंड्यांच्या काठ्यांचा वापर करून मारहाण केल्याचा आरोप आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना वेगळे केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. या गोंधळात काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी रेहान मसूद सय्यद (19), आदिल खान अहमद खान (19) आणि मिराज मोहम्मद फिरोज रईस (18) यांच्यासह इतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

घटनेनंतर परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असून शांतता कायम आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon