Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

कामचुकार पोलिसाला दणका! 'डायल ११२' कडे दुर्लक्ष करणे पडले महागात; जळगाव एसपींची 'ऑन द स्पॉट' कारवाई!

ळगाव : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या 'डायल ११२' सेवेकडे हलगर्जीपणे दुर्लक्ष करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर जळगाव पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे.

आलेल्या तक्रारींची दखल घेत, संबंधित कर्मचाऱ्याची तात्काळ बदली करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सतीश सुकलाल निकम (बकल नंबर १४७४) कर्तव्यावर असताना त्यांच्या 'एमडीटी' मशीनवर मदतीसाठी तीन कॉल्स प्राप्त झाले होते. मात्र, त्यांनी या कॉल्सकडे गांभीर्याने न पाहता घटनास्थळी जाण्याचे टाळले.

विशेष म्हणजे, मदतीसाठी आलेले कॉल प्रत्यक्ष ठिकाणी न जाता त्यांनी त्याच ठिकाणावरून 'क्लोज' केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार पोलीस दलाच्या शिस्तीला आणि जनतेच्या विश्वासाला धक्का देणारा असल्याचे प्रशासनाने नमूद केले.
या घटनेची गंभीर दखल घेत जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कडक भूमिका घेतली. त्यांनी निकम यांना तात्काळ तालुका पोलीस ठाण्यातून कार्यमुक्त करून पुढील आदेशापर्यंत जळगाव नियंत्रण कक्षात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon