Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

"मोदींविरोधातील वक्तव्यानंतर तरुणीचा व्हिडिओ व्हायरल; हात जोडून म्हणाली, 'माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा.'"

दिल्ली आंदोलन दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप असलेल्या एका तरुणीचा माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये संबंधित तरुणीने आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करत देशाची माफी मागितल्याचा दावा केला आहे. मात्र, या व्हिडिओची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही.

व्हायरल व्हिडीओ मध्ये तरुणी आंदोलना दरम्यान चुकीच्या माहितीच्या प्रभावाखाली येऊन अयोग्य वक्तव्य केल्याचे सांगितले आहे. तसेच आपण केलेले कृत्य चुकीचे असल्याची कबुली देत पुन्हा अशी चूक होणार नसल्याचेही ती म्हणते. व्हिडिओमध्ये तिने स्वतःचे वय 15 वर्षे असल्याचा दावा केला असून, याबाबत सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान या प्रकरणात पोलिसानी यापूर्वी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला होता .सुरुवातीला नोएडामध्ये झिरो एफआयआर दाखल करण्यात आली होता. त्यानंतर तपासासाठी हे प्रकरण नवी दिल्लीतील संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. तक्रारदाराने पंतप्रधानांविरोधातील कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सार्वजनिक शांतता बिघडण्याची शक्यता व्यक्त केली होती.

या घडामोडींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला. त्यामध्ये त्यांनी आंदोलना दरम्यान स्वतःविरोधात अपशब्द वापरणाऱ्या काही तरुणांबद्दल प्रतिक्रिया देताना, राग किंवा सूडाची भावना न ठेवता त्यांना योग्य दिशा देण्याची गरज असल्याचे म्हटले. तरुण वयात चुका होऊ शकतात, मात्र त्यातून शिकण्याची संधीही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी समाजालाही संयम बाळगण्याचे आवाहन करत, संवाद आणि योग्य मार्गदर्शनातूनच अशा घटनांना आळा घालता येईल, असे मत व्यक्त केले. दरम्यान, संबंधित तरुणीचा माफीनाम्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon