Dailyhunt
मोठी बातमी! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 'या' खेळाडूने केली निवृत्ती जाहीर!

मोठी बातमी! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 'या' खेळाडूने केली निवृत्ती जाहीर!

का अनुभवी फलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत दक्षिण आफ्रिकेच्या रॅसी व्हॅन डर डुसेनने हा निर्णय जाहीर केला.

आपल्या पोस्टमध्ये त्याने देशासाठी खेळण्याचा अनुभव आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान असल्याचे म्हटले आहे.

प्रोटियाजची जर्सी परिधान करताना मिळालेला अभिमान, त्यासाठी लागणारे समर्पण आणि त्या प्रवासात मिळालेली समाधानाची भावना याबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्याने आपल्या कुटुंबीयांसह क्रिकेट बोर्डातील अधिकाऱ्यांचेही आभार मानले.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये व्हॅन डर डुसेनची कामगिरी विशेष ठरली. त्याची सरासरी एका टप्प्यावर ६० च्या आसपास होती, जी उच्च दर्जाची मानली जाते. निवृत्तीच्या वेळी ही सरासरी सुमारे ५० पर्यंत आली होती. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द उशिरा, जवळपास २९व्या वर्षी सुरू झाली, पण त्यानंतर त्याने लवकरच संघात आपले स्थान पक्के केले. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने दोन शतके झळकावत संघाच्या उपांत्य फेरीपर्यंतच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली.

टी-२० क्रिकेटमध्ये त्याचा प्रभाव तुलनेने कमी असला, तरी तो विविध आंतरराष्ट्रीय लीगमध्ये सक्रिय राहिला आहे. काही काळ तो आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत अव्वल दहामध्येही होता. आयपीएलमध्ये त्याने राजस्थान रॉयल्सकडून तीन सामने खेळून २२ धावा केल्या. पुढे तो केवळ लीग क्रिकेटमध्ये खेळत राहणार की पूर्णपणे क्रिकेटपासून दूर जाणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon