Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

मोठी बातमी.! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील चार वाहनांचा अपघात.!

पमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील चार वाहनांचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. नांदेड दौऱ्यावर असताना हा अपघात घडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अपघातात ताफ्यातील चार गाड्यांचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

अपघाताबाबत पुढील अपडेट लवकरच आपल्या पर्यंत पोहचवू….

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon