नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी मासिक गुन्हे आढावा बैठक घेतली असता मागील काही दिवसांमध्ये मालमत्तेविरुध्च्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अज्ञात चोरट्यांचा शोध घेवून त्यांना जेरबंद करुन मालमत्तेविरुद्च्या घटनांना प्रतिबंध करणे, जबरीचोरी चे गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सूचना दिल्या होत्या.
तळोदा पोलीस ठाणे अभिलेखावरील ना उघड गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना दिनांक २७/०८/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ६ ते ७ दिवसापूर्वी तळोदा शहरातील भंन्साली प्लाझा समोर तसेच ठानेदार गल्लीत झालेली जबरीचोरी ही, तळोदा तालुक्यातील रोझवा येथील तीन इसमांनी केलेली आहे, अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सदरची माहिती पथकाला कळवून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तळोदा तालुक्यातील रोझवा गावी जावून माहिती घेवून संशयीत ३ इसमांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांची नावे गावे विचारले असता त्यांनी त्यांचे नावे ०१) संदिप रायसिंग नाईक वय २१ वर्षे, ०२) युवराज सायसिंग नाईक वय- २३ वर्षे, ०३) धिरेश रमेश नाईक वय १९ वर्षे तिन्ही राहणार रोझवा ता. तळोदा जि. नंदुरबार. असे सांगितले. त्यानंतर त्यांना सदर गुन्ह्यांबाबत विचारपूस केली असता त्यांनी संगणमत करुन सदर गुन्हे केल्याची कबूली दिली आहे. आरोपींनी जबरीचोरी करतांना वापरलेली विना नंबर ची मोटार सायकल बाबत विचारपूस केली असता ती दोन वर्षापूवी जिजामाता कॉलेज समोरील गेटजवळून चोरी केल्याची कबूली दिली. सदर आरोपीतांकडुन एकूण दोन गुन्ह्यातील मोबाईल व एक मोटारसायकल असा एकूण ३९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीतांकडुन जप्त करण्यात आला आहे.
तळोदा पोलीस ठाणे येथील दोन जबरीचोरी चे व उपनगर पोलीस ठाणे येथील एक मोटार सायकल चोरीचा गुन्हा असे एकूण तिन्ही गुन्ह्यात एकूण ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर आरोपी हे मोटार सायकलची चोरी करुन, सामान्य जेष्ठ नागरीकांना लक्ष करुन, त्यांच्या मोटार सायकलच्या मागून येऊन, त्यांना थांबवून, त्यांच्या खिशातुन बळजबरीने मोबाईल चोरुन नेणे हि त्यांची चोरी करण्याची पद्धत होती असे तपासात समजून आले.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधिक्षक अशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उप निरीक्षक मुकेश पवार, महेश निकम, विकास गुंजाळ पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार सचिन सैंदाणे, निशीगंध गवळे, राहुल पांढारकर यांच्या पथकाने केली आहे.
